महत्त्वपूर्ण ठराव व पत्रव्यवहार
ठराव : मुंबई शहर हे फूटबॉल, क्रिकेट, खो-खो, हॉकी, कबड्डी अशा विविध खेळांचे माहेरघर... जगाला नामवंत खेळाडू मुंबई शहरामुळे मिळाले. परंतु अनेक खेळाडूंना दुर्दैवाने दुखापत झाल्यास परिस्थितीमुळे योग्य उपचार मिळू शकत नाहीत आणि परिणामस्वरुप त्यांना खेळणे अर्ध्यावर सोडावे लागते, त्यांची कारकीर्द अकाली संपुष्टात येते. ही समस्या ध्यानात घेऊन दुखापत झालेल्या खेळाडूंना मनपा रूग्णालयांमध्ये आरोग्यसेवा पुरविण्यात यावी अशी ठरावाची सूचना मांडली आणि एकमताने मंजूर झाली. केईएम रुग्णालयाने याची अंमलबजावणी करण्याची तयारी लेखी अभिप्रायाद्वारे कळवली.

ठराव : मुंबई शहरातील पेट्रोलपंपच्या जागा पेट्रोलपंप व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाकरिता विकसित करण्यास देऊ नये अशी तरतूद विकास नियंत्रण नियमावलीत करण्यात यावी.

ठराव : मुंबईतील प्रदुषण व वाहतुक कोंडीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर उद्यान, मैदाने व पटांगणांच्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सायकल स्टॅण्ड महापालिकेमार्फत उभारण्यात यावेत.

ठराव : शासकिय सेवेत असणाऱ्या पुरूषांना त्यांच्या पत्निच्या प्रसुतीच्या वेळी Maternity Benefit Act च्या तरतुदी अन्वये २ आठवड्याची प्रसुती बाह्य रजा मंजुर करण्यात यावी.

ठराव : महिला प्रवासींच्या स्वच्छतागृहांच्या समस्येवर उपाय म्हणून बेस्टच्या अनेक जुन्या मोडकळीस आलेल्या तसेच वापरातून बाद झालेल्या बसेसचे रुपांतर करुन सुसज्ज फिरती स्वच्छतागृहे निर्माण करावीत.

ठराव : कोळी व आग्री बांधवांना मासेविक्री करण्यास परवाने देण्यात यावे व परप्रांतियांना मासेविक्री करण्यास बंदी करण्यासंदर्भात ठराव मांडला.

पत्रव्यवहार : साईसुंदर नगरमधील रहिवाश्यांना पाण्याच्या तुटवड्यामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी समिती सभेत मुद्दा उपस्थित

पत्रव्यवहार : रेल्वे स्थानकाजवळून जाणाऱ्या एल्फिन्स्टन स्टेशन रोडचे प्रभादेवी स्थानक मार्ग असे नामकरण करण्याबाबत

पत्रव्यवहार : मोतीलाल ओसवाल समोरील परळ एस. टी. डेपोची भिंत व मनपा पदपथ या मधील तयार होणारी जागा (जूनी घनकचरा विभागाची असलेली चौकी) या ठिकाणी कचरा निर्मुलन केंद्र उभारण्याबाबत...

पत्रव्यवहार : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांना आर्थिक संकटात दिलासा मिळावा या दृष्टीने मंडप भाडे, परवानगी शुल्क व इतर कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये, ते माफ करावे याकरिता प्रयत्न...

पत्रव्यवहार : वरळी - प्रभादेवी - सिद्धिविनायक मंदिर - पोर्तुगिज चर्च ते दादर रेल्वे स्टेशन (प.) या मार्गावर नव्याने बस सेवा सुरू करण्याबाबत पाठपुरावा

पत्रव्यवहार : बेरोजगारीच्या समस्येवर उपाय म्हणून महिला बचतगटांना पदपथांवर पसारी पसरून धंदा करण्यापेक्षा रस्त्यावर वाहन उभे करून वस्तू विक्री करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून त्यांना उदरनिर्वाहाचा मार्ग मिळेल आणि पदपथ मोकळे होतील.