कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मदतीचा हात...
एक दृष्टीक्षेप
गत २ वर्षांहुन अधिक काळ अवघे जग कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे एका आपत्तीचा सामना करित आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय दळणवळण केंद्र असल्याकारणे अर्थातच जागतिक आपत्तीचा मोठा फटका आपल्या शहरास बसला. या काळात मी नगरसेवक नात्याने वॉर्डमधील जनतेसाठी विविध उपक्रमांमधुन कर्तव्य बजावत आहे, एक विस्तारित कुटुंब म्हणून आपण वॉर्ड १९४ मधील सर्व रहिवाशी या संकटकाळात एकत्र होतो आणि आहोत.
या काळात दोन वेळेस मला कोरोनाची लागण झाली, त्यामुळे कोरोना बाधितांच्या वेदना मी समजुन घेऊ शकलो. आज मागे वळुन पाहताना कोरोनामुळे आपण आपल्या वॉर्डमधील काही रहिवासी, शिवसैनिक व पदाधिकारी यांना गमावल्याचे दु:ख नजरेसमोर येते आणि डोळे भरून येतात. या सर्वांना भावपूर्ण आश्रुंजली…! दुर्दैवाने ज्या घरांमधील कमावता आधार काळाने ओढुन घेतला, त्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे.
कोरोना काळात केलेल्या कार्यावर दृष्टीक्षेप :
- कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अपरिहार्य लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजीरोटीवर गदा आली. अचानक उदरनिर्वाहाचे मार्ग बंद झाल्याचे ध्यानात घेऊ गरीब व गरजु जनतेस मोफत रेशन प्रभागात घरपोच उप्लब्ध करून देण्यात आले.
- लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन लसीकरण केंद्रे जागोजागी उभारली. तसेच, ‘लसीकरण आपल्या दारी’ मोहिम राबविण्यात आली. कोरोना चाचणी करिता नागरिकांना चाचणी केंद्रे तसेच मोबाइल डिस्पेन्सरीद्वारे टेस्ट सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. रुग्णांना वेळेवर पोहचवता यावे यासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात आली.
- कोरोना प्रादुर्भावाच्या काळात राज्यभरात रक्तपुरवठ्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला. रक्ताची कमतरता ध्यानात घेऊन आदरणीय मुख्यमंत्री – शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला अधिकाधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले. याच पार्श्वभुमीवर सन्माननीय मंत्री, युवासेना प्रमुख श्री. आदित्य ठाकरे ह्यांच्या आदेशानुसार आवश्यक रक्त संकलनाकरिता महारक्तदान शिबिराचे आयोजन, जनजागृती तसेच स्थानिक मंडळांना प्रोत्साहन दिले.
- रुग्णालयात व डॉक्टरांकडे कोरोनामुळे साथीच्या रोगांची चिकित्सा व उपचार होण्यात विलंब होत आहे, हे ध्यानात घेऊन प्रभागात ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमाच्या अंतर्गत विनामुल्य आरोग्य शिबिरे व मोफत औषध वितरणासह भरविण्यात आले.
- मुखपट्टी अर्थात मास्क आणि स्वच्छतेकरिता सॅनिटायझरचा वापर सर्वांनी करावा, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम सारख्या औषधांचे सेवन अधिकाधिक जनतेने करावे, ऑक्सिमिटर व पल्समीटर यांच्या सहाय्याने आरोग्यातील अनियमितता वेळीच ध्यानात यावी या उद्दीष्टाने घरोघरी जाऊन मास्क, सॅनिटायझर, औषधे, सोसायट्यांमध्ये सॅनिटायझर स्टॅन्ड, ऑक्सीमीटर, पल्स मीटर ई. चे नियमित स्वरुपाने वाटप करण्यात आले.
- प्रभागात वेळोवेळी धुम्रफवारणी तसेच जंतुनाशक औषधांची फवारणी करून परिसर स्वच्छ राखण्यात आला.